प्रशिक्षण सूचना


नविन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (Version 2.0) चे अंमलबजावणीबाबत सूचना

१) नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपले विभागांच्या सर्व Laddar मध्ये अधिकारी Assign करणे आवश्यक आहे.

२) नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये लॉगीन करणेसाठी जुन्या प्रणालीमध्ये लॉगीन पेजवर New CMS (Version 2.0) या बटणावर क्लिक करावे.

३) सर्व विभागांच्या Reception User व IT Nodal Officer यांना नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे व विभागांच्या सर्व Laddar मध्ये अधिकारी Assign करणेबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. याबाबत काही अडचण आल्यास नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीमधील युजर मॅन्युअलचा वापर करावा.

४) नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीची लिंक जुन्या प्रणालीप्रमाणेच असणार आहे. परंतु विभागांच्या सर्व Laddar मध्ये अधिकारी Assign करेपर्यंत जुनी प्रणाली सुरु राहील व सर्व Laddar मध्ये अधिकारी Assign झाल्यानंतर सध्याची तक्रार व्यवस्थापन प्रणाली बंद करून व त्या प्रणालीच्या लिंकवर म्हणजेच (http://complaint.punecorporation.org/) या लिंकवर नविन तक्रार व्यवस्थापन प्रणाली लिंक करण्यात येणार आहे.

५)नविन तक्रार व्यवस्थापन प्रणाली वापराबाबत अथवा Laddar मध्ये अधिकारी Assign करणेबाबत काही शंका / अडचण असल्यास ६६१५, ६६१७ / ६६१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

६)जे विभाग नव्याने नविन तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केलेले आहेत व ज्यांना प्रणालीचे युजर आयडी व पासवर्ड मिळाला नाही त्या विभागांना युजर आयडी व पासवर्ड त्याचे खात्याचे ईमेल आयडीवर पाठविण्यात आले आहेत.